ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तोरसोळे येथे २५ जानेवारीला माघी गणेश जयंती उत्सव.

तोरसोळे येथे २५ जानेवारीला माघी गणेश जयंती उत्सव.

प्रकाशन: 21 Jan 2023 02:14 PM
वाचन संख्या 28

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तोरसोळे येथील श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ (रजि.)आयोजित बुधवार २५ जानेवारीला माघी गणेश जयंती उत्सव व श्री गणेश मंदिराचा १५ वा वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त सकाळी ८.३० वाजता श्री गणेश पुजा व अभिषेक, सकाळी ९.३० वाजता श्री गणेश पालखी मिरवणूक, सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापुजा ,दुपारी ११ वाजता महाआरती, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद/भंडारा ,सांयकाळी ३ वाजता महिलांचे हळदीकुंकू, सांयकाळी ६.३० वाजता विविध भजने, सांयकाळी ७.३० वाजता मान्यवरांचे सत्कार, ८.३० वाजता मनोरंजनात्मक भजने, राञी १०.३० वाजता महिलांची डबलबारी भजनांचा जंगी सामना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व कार्यक्रम श्री.गणेश मंदिर देवस्थान, तोरसोळे-मधली वाडी येथे आयोजित करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ तोरसोळे यानी कळविले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स