ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार नितेश राणे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

प्रकाशन: 21 Jan 2023 09:59 AM
वाचन संख्या 53

शिक्षक मतदारांच्या घेणार बैठका व गाठीभेटी ; कणकवली पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला विशेष उपस्थिती.

वैभववाडी / नवलराज काळे : भारतीय जनता पार्टीचे कणकवली-देवगड- वैभववाडीचे आमदार नितेश राणे हे आज शनिवार २१ जानेवारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ बैठका, शिक्षक मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
२१ रोजी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट हायस्कूल येथे ९.३० वाजता आमदार नितेश राणे हे शिक्षक मतदारांच्या भेटी घेत आणि बैठक घेत हा दौरा सुरु झाला आहे . आता १० वाजता कणकवली तालुक्यातील करूळ हायस्कूलमध्ये शिक्षक मतदारांची बैठक होईल. १०.३० वाजता कणकवली कॉलेजमध्ये शिक्षक मतदार संघातील मतदारांची बैठक घेऊन चर्चा करतील. त्यानंतर ११ वाजता कणकवली पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता ओसगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारणी ला ते उपस्थित राहणार आहेत.

मतदार संघातील विशेष कार्यक्रमांना ते प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. ग्रामस्थ,शेतकरी, शिक्षक,मच्छीमार,कार्यकर्ते, पदाधिकारी, यांच्या गाठीभेटी सुद्धा आमदार नितेश राणे घेणार आहे. यावेळी विकास कामांवर आणि जनतेच्या मागण्यांवर चर्चा, संघटनात्मक बैठका घेणार आहेत. मतदार संघात गाठीभेटी घेणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स