मच्छिमारांना मंजूर केलेल्या डिझेल परताव्याबाबत मालवण तालुका 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षा तर्फे मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षा तर्फे मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधव व सोसायट्यांना मंजूर झालेल्या डिझेल परताव्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत व शालेय शिक्षण मंत्री तसेच सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांनाही बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे विशेष धन्यवाद देण्यात आले आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा यांच्या या युतीच्या सरकारने सामान्यांना जलद पद्धतीने सोयी सुविधा पुरविण्याची यंत्रणा निर्माण केली असून यामुळे मच्छिमार बांधव व सोसायटी यांनाही डिझेल परतावा विषयक योग्य न्याय मिळाल्याचे प्रतिपादन मालवण तालुका ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)