सडूरे पोस्ट ऑफीसचे पोस्ट मास्टर विकास चौधरी यांचे IBPS मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सुयश ; मालवणच्या पोस्ट पेमेंट बँकेत असिस्टंट मॅनेजर पदी निवड.
वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या सडूरे पोस्ट ऑफीसचे पोस्ट मास्टर विकास चौधरी यांना ‘IBPS’ मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळाले असून त्यांची मालवण येथील पोस्ट पेमेंट बँकेत असिस्टंट मॅनेजर पदी झाली निवड आहे.
विकास चौधरी हे सडूरे पोष्ट ऑफिस मध्ये पोस्ट मास्टर पदावर कार्यरत असताना ग्राहकांना उत्तम सुविधा देत प्रामाणिक काम केले. पोस्ट ऑफिस कडून राबवत असलेले सर्व योजना जनते पर्यंत पोचविण्याचा त्यांनी प्रमाणिक प्रयत्न केला. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)