ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सरस्वती विद्यामंदिर कुवळे क्र.१ चा अमृत महोत्सव सोहळा शानदार दिमाखात संपन्न.

सरस्वती विद्यामंदिर कुवळे क्र.१ चा अमृत महोत्सव सोहळा शानदार दिमाखात संपन्न.

प्रकाशन: 20 Jan 2023 03:53 PM
वाचन संख्या 407

सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे झाले आयोजन.

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील कुवळे गांवातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरस्वती विद्यामंदिर कुवळे क्र. १ या सुप्रसिद्ध शाळेचा अमृत महोत्सव शानदार दिमाखात दोन दिवस चालला. हा अमृत महोत्सव शुक्रवारी १३ व १४ जानेवारी २०२३ ला प्रशालेच्या प्रांगणाच्या रंगमंचावर आयोजीत करण्यात आला होता. या सोहळ्याचे उद्घाटन कुवळे गांवचे नवनिर्वाचित सरपंच सुभाष बाळकृष्ण कदम यांच्या हस्ते झाले.

या दोन दिवशीय सोहळ्याच्या नियोजनामध्ये शुक्रवारी १३ जानेवारीला सकाळी १० वाजता उद्घाटन मान्यवरांचे स्वागत ११ ते १ आरोग्य शिबिर आणि दुपारी ३ ते ५ या वेळेत व्याख्यान सत्रा मध्ये शिरगांवचे समाजशील डॉक्टर राजेंद्र चव्हाण आणि माजी नौसेना अधिकारी जी व्हीं डिसोजा यांचे व्याख्यान झाले. रात्री ८ नंतर सरस्वती विद्यामंदिर कुवळे क्र १ आणि माध्यमिक शाळा कुवळे विद्यार्थी यांचा गुणगौरव आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. दुसऱ्या दिवशी शनिवारी १४ जानेवारीला सकाळी १० वाजता सरस्वती पूजन आणि सकाळी ११ ते १ माजी शिक्षक सन्मान सोहळा आणि माझी जेष्ठ नागरिक विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात माजी शिक्षकांमध्ये १९७० ते २०२० साला पर्यंत चे माजी शिक्षकांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला. दुपारी ३ ते ५ महिलांचे हळदीकुंकू आणि विविध कार्यक्रम आणि रात्री आठ नंतर शाळेच्या माजी विद्यार्थी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

हा दोन दिवशीय अमृत महोत्सव सोहळा समिती अध्यक्ष अमोल परब यांच्या अध्यक्षतेखाली आखला गेला होता. अमृत महोत्सव आयोजनामध्ये अमृत महोत्सव उत्सव समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ सर्व ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थी,शाळेचे मुख्याध्यापक श्री विष्णू परब सर आणि सर्व शिक्षक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री संतोष साटम सर आणि सर्व शिक्षक अंगणवाडी चे अंगणवाडी सेविका,बचत गट आणि गावातील सर्व महिला वर्ग तसेच आरोग्य विभागाच्या सहकार्याने मोठ्या दिमाखात कुवळे गावाने शाळेचा अमृत महोत्सव सोहळा यशस्वीपणे संपन्न केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स