ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
परमहंस भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती सराव परीक्षा २२ जानेवारीला.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

परमहंस भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती सराव परीक्षा २२ जानेवारीला.

प्रकाशन: 20 Jan 2023 10:53 AM
वाचन संख्या 114

कणकवली कॉलेज व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे परीक्षा केंद्रे.

सावंतवाडी | ब्युरो न्यूज : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा २२ जानेवारीला कणकवली कॉलेज कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या दोन केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले आहे. संस्थानचा प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी या परीक्षेस पात्र असून यानंतर किंवा परीक्षेच्या दिवशी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरणा पावती सोबत ठेवायची आहे.
ही परीक्षा पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) साठी सराव परीक्षेस प्रवेश घेतलेल्यांसाठी आहे. शासकीय परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे ही परीक्षा होणार असून पेपर १ स. ११ ते १२:३९ व पेपर २ दुपारी १:३० ते ३ या वेळेत होतील. विद्यार्थ्यांनी स.१९:३० वा. नियोजीत हॉलमध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थी बैठक क्रमांक यादी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमसाठी स्वतंत्र असून ती परीक्षेदिवशी स. ९ वा. परीक्षा केंद्राबाहेर लावण्यात येईल. यादी पाहून विद्यार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक व खोली नंबर निश्चित करावा. परीक्षा शुल्क भरणा पावती हेच हॉल तिकीट असून अन्य कशाचीही आवश्यकता नाही. या संदर्भात काही अडचण असल्यास संबंधित केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावयाचा आहे.

कणकवलीतील बैठक क्रमांक घ व सावंतवाडीचे ड ने सुरू असून त्यानंतर च मराठी व ए इंग्रजी त्यानंतर इयत्ता व त्यानंतर ३३ अंकी बैठक क्रमांक असणार आहे. अधिक माहितीसाठी संस्थान व्यवस्थापक विजय केळुसकर, शैक्षणिक मंडळ अध्यक्ष गजानन उपरकर यांच्याशी संपर्क साधावा. सावंतवाडी केंद्रासाठी रावजी परब व सिध्देश कुलकर्णी (कळसुलकर हायस्कूल) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स