ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
शासकीय योजनेतून उभारण्यात आलेल्या घरगुती शौचालयांचे होणार सर्वेक्षण…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शासकीय योजनेतून उभारण्यात आलेल्या घरगुती शौचालयांचे होणार सर्वेक्षण…!

प्रकाशन: 20 Jan 2023 10:40 AM
वाचन संख्या 85

विवेक परब | ब्युरो चीफ : शासकीय योजनेतून तथा हागणदारीमुक्त गांवसह निर्मलगाव करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागामध्ये शौचालय उभारणीसाठी शासनाने विविध योजनांमधून करोडो रुपयांचे अनुदान दिले आहे. गांवा-गांवामध्ये घरोघरी मोठ्या संख्येने शौचालयांची उभारणी झालेली आहे. त्याची तपासणी मोहीम शासनाकडून आता सुरू केली आहे. त्यामध्ये शौचालयाच्या सेप्टिक टँकचा फोटो काढून तो अपलोड करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. कागदोपत्री उभारणी दिसत असलेल्या या शौचालयांचा लोकांकडून खरेच उपयोग केला जातो आहे का, याची पडताळणी होणार आहे.

प्रशासनाच्या निर्मलग्राम आणि त्यानंतर हागणदारीमुक्त गांव या अभियानाला गांवोगावी लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनांमधून घरोघरी शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नवीन घराचे बांधकाम करताना शौचालयाची उभारणी करण्याची अट घालण्यात आली. करोडो रुपयांचा निधी खर्च होऊन वैयक्तिक अथवा सार्वजनिक शौचालय या माध्यमातून सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानंतर, अनेक गावांमधील घरांमध्ये शौचालयाची उभारणी झाली नसल्याच्या शक्यतेने प्रशासनानेगावागावांमध्ये किती घरांमध्ये किती शौचालयाची उभारणी करण्यात आलेली आहे याचे सर्व्हेक्षण करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स