ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माध्यमिक विद्यामंदिर साळशीचे शासकीय रेखाकला परीक्षेत भरीव यश.

माध्यमिक विद्यामंदिर साळशीचे शासकीय रेखाकला परीक्षेत भरीव यश.

प्रकाशन: 20 Jan 2023 11:11 AM
वाचन संख्या 208

संतोष साळसकर | सहसंपादक : २०२२-२३ या शैक्षणिक वर्षा साठी शासनाकडून घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी( पहिली परीक्षा ) चा निकाल घोषित करण्यात आला.


या परीक्षेला देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर साळशी चे एकूण ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते .त्या पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ,शाळेचा या परीक्षेचा निकाल ८८% लागला आहे.
या परीक्षेत ‘B श्रेणी’ मध्ये म़ंदार साळसकर , नम्रता पवार, केतकी साळसकर हे ३ विद्यार्थी चमकले व ‘C श्रेणी’ मध्ये २५ विद्यार्थी असे
असे एकूण २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे कला शिक्षक आनंद मेस्त्री व पुरुषोत्तम साटम यांचे अभिनंदन मुख्याध्यापक- माणिक वंजारे , चेअरमन -सत्यवान सावंत, संस्थेचे सर्व पदाधिकारी,पालक , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स