ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीच्या श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्यावतीने माघी गणेश जयंतीनिमित्त विधिध कार्यक्रमांचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीच्या श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्यावतीने माघी गणेश जयंतीनिमित्त विधिध कार्यक्रमांचे आयोजन.

प्रकाशन: 19 Jan 2023 01:14 PM
वाचन संख्या 50

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
कणकवली शहरातल्या श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे २४ ते २६ जानेवारी दरम्यान उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

मंगळवारी २४ तारखेला सकाळी ५ वा. श्री गणेशमूर्तीचे आगमन होणार आहे.

बुधवारी २५ तारखेला सकाळी ७ वा. पासून गणेशमूर्ती प्रतिष्ठापना व पूजा, सकाळी ८ वा. सत्यनारायण महापूजा, सकाळी १०.३० वा. महाआरती, तीर्थप्रसाद, दु. १ वा. महाप्रसाद, २.३० वा. पासून श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ जानवलीचे बुवा रवी राणे, श्री कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बु. चे बुवा अभिषेक शिरसाट, प. पू. भालचंद्र प्रासादिक भजन मंडळ हळवलचे बुवा भास्कर गावडे, श्री मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ नागवेचे बुवा अमेय आर्डेकर, श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ जानवलीचे बुवा उदय राणे यांचे भजन, श्री गांगेश्वर अनभवानी प्रासादिक भजन मंडळ डामरेचे बुवा चिन्मय सावंत यांची भजने, ८.३० वा. महाआरती, ९.३० वा. जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, दांडेली- आरोस यांचा ‘शिव महाकाल’ हा प्रयोग सादर होणार आहे. गुरुवारी २६ तारखेला सायंकाळी ५ वा. सिंधुगर्जना ढोल पथकासह श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स