ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मालवण भाजपाने मानले आभार .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मालवण भाजपाने मानले आभार .

प्रकाशन: 19 Jan 2023 01:55 PM
वाचन संख्या 185

तत्काळ डिझेल परतावा दिल्याने मच्छिमार बांधव व सोसायट्या समाधानी असल्याचा निर्वाळा .

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भाजपाचे नेते व माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, बुथप्रमुख नारायण धुरी व वसंत गांवकर यांनी भाजपतर्फे मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार , पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार व युवा नेते डाॅ. निलेश राणे यांच्या मच्छिमार बांधव व सोसायटी यांच्या समस्यांच्या योग्य पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील भाजपा शिंदे गटाचे युती सरकार महाराष्ट्रात आल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली होती. यावेळी आमदार नितेश राणे व माजी खासदार युवा नेते डाॅ. निलेश राणे मयांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्येबाबत सविस्तर वास्तव स्थिती सांगितली होती. केंद्रातील मत्स्य संपदा योजना सक्षमपणे जिल्ह्यात न राबविणे, त्यात राजकीय हस्तक्षेप करणे ,डिझेल परतावा न मिळणे ,सागर मित्र यांची नेमणूक न करणे, वादळातील मिळालेली नुकसान भरपाईत पक्षपात करणे असे प्रकार झाल्याची कैफियत यावेळी पालकमंत्र्यांकडे मांडली गेली होती . यालाच अनुसरून पालकमंत्र्यांनी मंत्रालयामध्ये मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक आयोजित केली होती. त्यावेळी डिझेल परतावा वेळेवर न मिळाल्यास सोसायटीचे व मच्छीमारांचे होणारे नुकसान या संदर्भात निलेश राणे यांनी स्पष्टता केली होती. नि:पक्षपणे व मागे न लागता , लाचारी न करता भरघोस परतावा व संपूर्ण परतावा द्यावा अशी मागणी केली होती .त्या अनुसरून सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ डिझेल परतावा दिला. त्याचबरोबर केंद्रातील मत्स्य संपदा योजना जिल्ह्यात सक्षमपणे राबवण्यासाठी सागर मित्र नेमणूक करणे आवश्यक आहे अशी मागणी केली होती त्या अनुसरून जिल्ह्यात १० सागरमित्रांची नेमणूक केली. कायमस्वरूपी सहाय्यक आयुक्तांची सुद्धा तात्काळ नेमणूक करण्यात आली आहे. समुद्र गस्तीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करून कार्यान्वित करण्यात आली आहे .


भाजपा शिंदे सरकार मुळे प्रशासन कसे गतिमान झाले आहे याचीही प्रचिती जनतेला येत आहे. मच्छीमारांच्या प्रश्नाकडे युती सरकार गांभीर्याने पाहत आहे. आघाडी सरकार वेळी हक्काचे पैसे भीक मागल्यासारखा निधी मागावा लागत होता आणि सरकार उपकार करते अशा हमीभावात पक्षपात करून निधी देत होता. याचीच प्रसिद्धी घेण्याचे काम स्थानिक आमदार करत होते असा आरोप देखील करण्यात आला होता.


मत्स्य संपदा योजनेतील व चांदा ते बांदा ,सिंधू रत्न योजनेतील प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर कार्यवाहीत होण्यासाठी डाॅ. निलेश राणे यांच्यामार्फत भाजपा कार्यरत असून मच्छीमार व मच्छीमार सोसायटीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे .तसेच माशांवर प्रक्रिया करणारे उद्योग लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत मा. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहे .
डिझेल परताव्यासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल व सागर मित्र याची नेमणूक केल्याबद्दल मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व डाॅ. निलेश राणे यांचे मालवणचे माजी नगराध्यक्ष व भाजपा नेते अशोक तोडणकर , बुथप्रमुख नारायण धुरी,बुथ प्रमुख वसंत गांवकर व इतर भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी जाहीर आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स