ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'चेक बाऊन्स' प्रकरणी एक महिना तुरूंगवास आणि ८५ हजाराचा दंड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'चेक बाऊन्स' प्रकरणी एक महिना तुरूंगवास आणि ८५ हजाराचा दंड.

प्रकाशन: 18 Jan 2023 08:42 PM
वाचन संख्या 161

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या महाळुगे येथील सुरेश तुकाराम घाडिगांवकर यांनी विकत घेतलेल्या झाडाच्या मोबदल्यापोटी दिलेला रक्कम सत्तर हजार रुपयांचा धनादेश तथा चेक खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे अनादरीत झाल्याप्रकरणी दाखल खटल्यात येथील रहिवासी कमलुद्दीन अ डोंगरकर यांना देवगडचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. वाळके यांच्या न्यायालयाने एक महिना तुरुंगवास आणि ८५,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याकामी फिर्यादीच्या वतीने ॲड. कौस्तुभ मराठे, ॲड. अन्वी कुळकर्णी, ॲड. वीणा लिमये व ॲड. अपर्णा पराजंपे यांनी काम पाहिले.

सन २०१७ साली महाळुगे येथील फिर्यादींच्या मालकीच्या जमिनीतील आंबा, हेळा, फणस, गाणे या प्रकारातील मौल्यवान झाडे आरोपीने विकत घेतली होती. या विकत घेतलेल्या झाडांचा मोबदला अदा करण्यासाठी आरोपीने डोगरकर याने फिर्यादी गाडी यांना रक्कम ७०,००० रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश आरोपीच्या खात्यात पैसे नसल्यामुळे अनादरीत झाल्याने आरोपीविरुध्द धनादेश अनादराचा खटला देवगड न्यायालयात चालला होता. फिर्यादीच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादामुळे व सादर केलेले पुरावे ग्राहय मानत से देवगड न्यायालयाने आरोपीला १ महिना कारावास आणि रुपये ८५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा दिली आहे. तसेच दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा देखील सुनावली आहे.

(फोटो | प्रातिनिधिक )

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स