ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेत वैभववाडीच्या 'अर्जुन रावराणे विद्यालयाचे' सुयश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेत वैभववाडीच्या 'अर्जुन रावराणे विद्यालयाचे' सुयश.

प्रकाशन: 18 Jan 2023 04:09 PM
वाचन संख्या 106

कलाशिक्षक मंदार चोरगे यांचे लाभले होते मार्गदर्शन.

वैभववाडी | नवलराज काळे –: कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा घेण्यात आल्या होत्या सदर इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच कला संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. वैभववाडी येथील केंद्र क्रमांक ११५०१४ (अर्जुन रावराणे विद्यालय ) या केंद्रावर इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकुण १२७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील १११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केंद्राचा निकाल ८७.४०% लागला आहे. परिक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी उत्कर्ष लक्ष्मण हांडे, वैष्णवी भास्कर नादकर, प्रारब्ध प्रकाश पाटील, हर्ष अनिल पराडकर, खाजगी विद्यार्थ्यांमधून श्रावणी गंगाधर केळकर, सुयोग शशीकांत तांबे या ०६ विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी,१७ विद्यार्थ्यांना ‘ब’ श्रेणी तर ८८ विद्यार्थ्यांना ‘क’ श्रेणी प्राप्त झाली आहे. तर अर्जुन रावराणे विद्यालयाचे १९ विद्यार्थी या इंटरमिजिएट परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यातील सर्वच १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल १००% लागला आहे. प्रशालेच्या परिक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ०५ विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी, ०२ विद्यार्थ्यांना ‘ब’ श्रेणी तर १२ विद्यार्थ्यांना ‘क’ श्रेणी प्राप्त झाली आहे.

रेखाकला परीक्षेतील सहभागी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक मंदार चोरगे यांचे मार्गदर्शन लाभले होते. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख बी.एस.नादकर यांनी अभिनंदन केले. सदर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधील एस.एस.सी परीक्षा मार्च २०२३ मध्ये प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राप्त श्रेणी नुसार निकालामध्ये वाढीव गुणांच्या सवलतीचा लाभ मिळणार आहे.

ज्या सहभागी शाळांना निकाल पडताळणीसाठी अर्ज करावयाचा असेल तर त्यांनी प्रती विद्यार्थी ६०/- रुपये शुल्कासह व प्रमाणपत्रावरील दुरुस्तीसाठी प्रती विद्यार्थी १००/- रुपये शुल्कासह संबंधित शाळेने दि.२८-०१-२०२३ पर्यंत केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन केंद्र प्रमुख बी.एस.नादकर व कलाशिक्षक मंदार चोरगे यांनी केले आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स