युवासेना शिवसेना कुंभारमाठ यांचा रस्तारोकोचा ईशारा..!
मालवण | सुयोग पंडित: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण- कसाल राज्यमार्गा वरील जरीमरी घाटी येथील मुख्य रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाने केलेल्या मागील डागडुजीनंतरही वाहनांना योग्य रीतीने चालवता येत नाही. तसेच त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे . या रस्त्याचे कार्पेटीकरण न केल्यास २६ जानेवारीला रास्तारोको करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य कुंभारमाठ तथा युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब, युवासेना शाखाप्रमुख स्वामीदास शिरोडकर, संजय देऊलकर महिला पदाधिकारी शितल देऊलकर, मुक्ता राजपुत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)