ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ट्रॅव्हल्स व्येवसाहिक उमेश बाणे यांचा प्रामाणिकपणा...

ट्रॅव्हल्स व्येवसाहिक उमेश बाणे यांचा प्रामाणिकपणा...

प्रकाशन: 28 Sep 2021 06:20 PM
वाचन संख्या 231

ट्रॅव्हल्समध्ये विसरलेली पर्स मूळ मालकाकडे केली सुपूर्द !

मसुरे | प्रतिनिधी : आचरा येथून मुंबई येथे प्रवास करताना खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये विसरलेली पर्स मूळ मालकास परत केल्या बद्दल ट्रॅव्हल्स मालक उमेश बाणे यांचे कौतुक होत आहे.
पोयरे येथील सौ. लीना तुषार सावंत या अंधेरी – मुंबई येथे राहतात. गणपतीला त्या गावी गेल्या होत्या. दिनांक २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आचरा येथून शिवरामेश्वर (बाणे) ट्रॅव्हल्स ने मुंबईला येण्यास त्या कुटुंबियां सोबत निघाल्या होत्या. २१ रोजी सकाळी मुंबई येथे उतरण्याच्या घाई गडबडीत त्यांची पर्स गाडीमध्ये राहिली. या पर्स मध्ये मंगळसूत्र, रोख रक्कम आणि एटीएम कार्ड असे सुमारे दोन लाखाचा ऐवज होता. पर्स गाडीत विसरल्याचे लक्षात येताच त्वरित त्यांनी बसचे चालक यांच्याशी संपर्क साधला. चालक आदित्य नार्वेकर यांनी गाडीत शोध घेऊन पर्स ताब्यात घेतल्याचे त्यांना सांगितले. व मुंबईच्या कार्यालयातून ओळख पटवून नेण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सौ लीना सावंत यांनी सदर पर्स सर्व साहित्यासह ताब्यात घेत उमेश बाणे व चालक आदित्य नार्वेकर यांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स