ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भिरवंडेची 'कॅरम कन्या' आता राष्ट्रीय स्पर्धेत 'कॅरम क्वीन' बनून करणार राज्याचे प्रतिनिधीत्व ! ( विशेष)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भिरवंडेची 'कॅरम कन्या' आता राष्ट्रीय स्पर्धेत 'कॅरम क्वीन' बनून करणार राज्याचे प्रतिनिधीत्व ! ( विशेष)

प्रकाशन: 17 Jan 2023 09:51 AM
वाचन संख्या 276

सिंधुदुर्ग जिल्ह्याची ‘कॅरमकन्या’ दिक्षा नंदकिशोर चव्हाणची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत बाजी.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या भिरवंडे गावासारख्या ग्रामीण भागातून येणारी आणि कनेडी ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीत शिकत असलेली दिक्षा नंदकिशोर चव्हाण हिने नुकतेच चिपळूण डेरवण येथील राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

तिची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ती आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. पाचवीत असल्यापासून तिने कॅरम खेळातील कौशल्य दाखवायला सुरुवात केली होती. यापूर्वी तिने कॅरम स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त केली आहेत. तिच्या वडिलांचे केश कर्तनालय असून तेही एक चांगले क्रिकेट खेळाडू तथा फलंदाज आहेत. आपल्या मुली विविध क्षेत्रात विशेषतः खेळात , संगीतक्षेत्रात निपुण व्हाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

भिरवंडे सारख्या खेड्यात राहूनही कॅरम , क्रिकेट आणि संगीत यांचे कौशल्य संपादन करत स्वतःसह आपल्या मुलींनाही राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धेत उतरवणाऱ्या नंदकिशोर चव्हाण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या वतीने तिला ‘ नाभिक कॅरम कन्या ‘ म्हणून गौरविण्यात आले आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सिंधुदुर्ग नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर आणि त्यांच्या टीमने दिक्षाचे अभिनंदन केले आहे.

दिक्षा आता ‘कॅरम क्वीन’ झाली आहे. तिच्या फलंदाज वडिलांच्या क्रिडा स्वप्नातील यशाचे चौकार व षटकार ती कॅरम बोर्डवरुन पूर्ण करुन दाखवेलच अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स