मालवणचे माजी नगरसेवक श्री. विजय कृ. गांवकर कालवश.
मालवण | वैभव माणगांवकर : मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्यवस्थापक आणि देऊळवाडा येथील रहिवाशी विजय कृ. चव्हाण- गावकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
मालवणच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक व सहकार क्षेत्रातील विकासामध्ये नेहमीच हातभार लावलेल्या व मार्गदर्शन केलेल्या विजय कृ.गांवकर यांच्या निधनाने मालवण परिसरावर शोककळा पसरली आहे.
आंबा व्यावसायिक असणारे विजय चव्हाण-गावकर यांनी मालवण खरेदी विक्री संघात ४० वर्षे व्यवस्थापक म्हणून सेवा बजावली होती. मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या जडणघडणीत श्री. विजय चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. मालवण नगरपालिकेचे ते काहीकाळ नगरसेवक होते. या काळात त्यांनी शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावली. गेले काही दिवस ते आजारी होते. मालवण देऊळवाडा येथील स्मशानभूमीत आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालवण वायरी येथील आंबा व्यावसायिक संजय नरें आणि प्रा महेंद्र कविटकर यांचे ते सासरे होत
.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)