ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती प्रशिक्षण शिबीर संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती प्रशिक्षण शिबीर संपन्न.

प्रकाशन: 16 Jan 2023 09:36 PM
वाचन संख्या 84

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन जनजागृती प्रशिक्षण पार पडले. यावेळी एनडीआरएफच्या टीमने प्रात्यक्षिके सादर करून माहिती दिली. आपत्तीच्या काळात व्यक्तीचा जीव वाचवणे हेच प्रमुख ध्येय असले पाहिजे. घराजवळ पूरस्थिती आल्यास प्रथमता वीज बंद करणे. घरातील सर्व महत्वाची कार्ड सुरक्षित ठेवणे, वयोवृद्धांची अधिक काळजी घेणे, आपत्तीच्या काळात संबंधित आपत्तीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नंबर असणे आवश्यक आहे. घरात पाणी भरल्यास तारेला स्पर्श करू नये, सर्व जनावरांना घराच्या बाहेर सोडणे, मृत जनावरांची विल्हेवाट करणे. त्यामुळे महामारी होणार नाही. अपघातस्थळी प्रत्येकाने जखमीना मदत केली पाहिजे. मदत करणाऱ्यांना प्रशासन कोणताही त्रास देत नाही. मदत करणाऱ्यांना अडचण कधीच येणार नाही. विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर करत माहिती दिली.

यावेळी एनडीआरएफ चे टीम कमांडो धर्मेंद्र सेवड, बिबीशन मोरे, उमेश कुमार सिंह, संतोष जाधव, आदम हराळी, धंदे संदीप, कल्पेश कोकाटे, भगवान नागठणे, योगेश थोरात, रवींद्र पवार, ज्ञानेश्वर गव्हाळे, दत्तात्रय शिंदे, रामदास कोंगे तसेच यावेळी तहसीलदार प्रसन्नजित चव्हाण, महसूल नायब तहसीलदार श्री यमगर, नायब तहसीलदार श्रीमती कासकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, नायब तहसीलदार अनंत कवळेकर आदी उपस्थित होते. यावेळी सह्याद्री जीव रक्षक टीम करूळचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महसूल विभाग, तलाठी, ग्रामसेवक, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स