ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हळवलचे सुपुत्र व अनुभवी सजग पत्रकार उमेश परब यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुकाध्यक्ष पदी निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हळवलचे सुपुत्र व अनुभवी सजग पत्रकार उमेश परब यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुकाध्यक्ष पदी निवड.

प्रकाशन: 14 Jan 2023 12:35 PM
वाचन संख्या 217

धडाडीचे सडेतोड युवा पत्रकारीता व्यक्तिमत्व मयुर ठाकूर उपाध्यक्षपदी..!

मालवण I सुयोग पंडित : गेली १५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारीतेतील धडाडीचे व सजग व्यक्तिमत्व व हळवल गावचे सुपुत्र उमेश परब यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे तर जिल्ह्यातील सध्याचे धडाडीचे सडेतोड युवा नांव मयूर ठाकुर यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली पंचायत समिती येथील पत्रकार कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर झाली. त्यानंतर तालुकानिहाय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कणकवली तालुका अध्यक्षपदी उमेश परब व उपाध्यक्ष पदी आपला मयुर ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली. सचिव पदी रोहन पारकर यांची नियुक्ती केली. तर खजिनदारपदी जेष्ठ पत्रकार तांबे यांची निवड करण्यात आली तर सदस्य पदी विराज गोसावी यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग उपाध्यक्ष समिल जळवी, सचिव शिरीष नाईक, खजिनदार संजना हळदिवे, सहखजिनदार संजय भाईप, सदस्य मिलिंद धुरी, कांडरकर आदि सदस्य तसेच पत्रकार यावेळी उपस्थित होते.

श्री.उमेश परब यांनी आपली सिंधुनगरी चॅनलचे ब्युरोचीफ म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली होती. त्यानंतर ते आता राज्यस्तरावरील झी २४ तास साठी यशस्वी सेवा बजावत आहेत. या नियुक्ती बद्दल त्यांची आपली सिंधुनगरी चॅनल समूहातर्फेही अभिनंदन करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स