ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्त्रियांचा सन्मान हा आपल्या आईचा सन्मान असतो : कविवर्य अजय कांडर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्त्रियांचा सन्मान हा आपल्या आईचा सन्मान असतो : कविवर्य अजय कांडर

प्रकाशन: 13 Jan 2023 09:59 AM
वाचन संख्या 30

वारगांव येथील शेठ महादेव केसरकर स्मृतीदिन व विद्यालयाचा बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न.

संतोष साळसकर | सहसंपादक : कुठल्याही स्त्रीचा सन्मान हा आपल्या आईचा सन्मान आहे. आई महान आहे व नेहमी बाहेर पडतांना आईच्या पाया पडून बाहेर पडा , स्वतःतील गुण ओळखा , स्वतः कडे एक जरी चांगला गुण असला तरी आपण कर्तृत्वाने मोठे व्हाल. तसेच चांगले गुरुजन मिळणे हे आपले भाग्य आहे असे प्रतिपादन सुप्रसिध्द कविवर्य अजय कांडर यांनी वारगांव येथे संस्थापक शिक्षणमहर्षी शेठ म. वि. केसरकर यांच्या तेराव्या स्मृतीदिन कार्यक्रम व शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालयाच्या बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी केले.

हा कार्यक्रम वारगांव विकास मंडळ मुंबई या संस्थेने आयोजित केला होता. वारगांव हायस्कुलमध्ये वर्षभर अनेक उपक्रम, क्रीडा स्पर्धा राबविण्यात येतात. सदर उपक्रमात विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रशस्तीपत्रे देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

त्यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष शांताराम (बबनशेठ) केसरकर , जि.प. माजी सभापती रविंद्र जठार , वारगांव सरपंच नम्रता शेट्ये , उपसरपंच नारायण (नाना) शेट्ये , कार्याध्यक्ष विजय केसरकर , उपाध्यक्ष सदानंद कानकेकर, सचिव रमेश शेट्ये , खजिनदार सुनिल केसरकर , सदस्य सुधाकर नर , विश्वनाथ नर , जयवंत नर , संतोष पांचाळ , संतोष नर , माजी सरपंच प्रकाश नर , एकनाथ कोकाटे , रविंद्र केसरकर , मधुकर वळंजु , सुनिल कुळकर्णी , साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर , तंटामुक्ती अध्यक्ष राजेश जाधव , मुख्याध्यापक हनुमंत वाळके , माजी विद्यार्थी अतुल जाधव , वारगांव ग्रामपंचायत सर्व नुतन सदस्य व संस्था पदाधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारगांव विकास मंडळाचे सचिव रमेश शेट्ये यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख व स्वागत मुख्याध्यापक वाळके यांनी केले. त्यावेळी सानिका वारीसे व ऐश्वर्या देसाई या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. तसेच त्यावेळी विजय केसरकर , विश्वनाथ नर , सुधाकर नर , एकनाथ कोकाटे , राजा जाधव , रविंद्र जठार , संदीकर यांनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय भाषण सदानंद कानकेकर , उपाध्यक्ष यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आडोलीकर यांनी तर आभार उपाध्यक्ष सदानंद कानकेकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स