ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
संत दादा महाराज प्रभू यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

संत दादा महाराज प्रभू यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात संपन्न!

प्रकाशन: 08 Jan 2023 09:08 PM
वाचन संख्या 28

विवेक परब/ ब्यूरो चिफ– वायंगणी येथील श्री दत्त साक्षात्कारी संत दादा महाराज प्रभू यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री समर्थ दादा महाराज समाधी व दत्त मंदिर, वायंगणी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सकाळी रामदास प्रभू यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली. तसेच निशाण फेरी काढण्यात आली. तर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त चंद्रकांत कावले व सहकारी तसेच ओम साई प्रासादिक भजन मंडळाचे भजन सादर झाले. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. दादा महाराज यांच्या चरित्रावर यापूर्वी दोन भागात पुस्तके प्रकाशित करणारे महाराजांचे उपासक सीताराम उर्फ नाना करमळकर यांनी तिसऱ्या भागाचे पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे लिखाण सेवानिवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर यांनी केले आहे. या पुण्यतिथी कार्यक्रमास नाना करमळकर, उद्योजक डॉ. दीपक परब, हनुमंत प्रभू, रामदास प्रभू, दामोदर साळकर, अंभू प्रभू, दत्तप्रसाद पेडणेकर यांसह ग्रामस्थ व महाराजांचे भक्त उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स