ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शुटिंगबॉल पंच अशोक दाभोलकर, शशिकांत गवंडे यांचा औरंगाबाद येथे सत्कार!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शुटिंगबॉल पंच अशोक दाभोलकर, शशिकांत गवंडे यांचा औरंगाबाद येथे सत्कार!

प्रकाशन: 08 Jan 2023 09:02 PM
वाचन संख्या 44

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भूतपूर्व फेडरेशन शुटिंगबॉल पंच व स्पर्धा नियंत्रक वेंगुर्ले येथील अशोक दाभोलकर याना कृषी मंत्री श्री. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लौड, औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी स्पर्धा मार्गदर्शन तसेच स्पर्धा नियंत्रक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. दोन दिवस कृषी मंत्री श्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत अतिशय शिस्तबद्धपणे संपन्न झालेल्या ह्या स्पर्धेत देशभरातील ४८ संघानी सहभाग नोंदविला होता.

त्याचवेळी अशोक दाभोलकर यांनी क्रीडा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल औरंगाबादचे नामवंत राष्ट्रीय शुटिंगबॉल खेळाडू व विद्यमान नगराध्यक्ष श्री. आबासाहेब काळे ह्यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय पंच श्री. शशिकांत गवंडे ह्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अशोक चौधरी, विष्णू निकमसर, रामभाऊ कोलते, राजेन्द्र मोहिते, बाळू पाटील तसेच राष्ट्रीय खेळाडू सर्वश्री पांडुरंग कदम, मुस्ताकसर ( नगर), अश्पाकभाई, मधुकर दांडगे, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक मन्सूर काद्री सर, डि.एस.पी. रामलाल शहादे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स