ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
परब मराठा समाजाच्या हिरक महोत्सवा निमित्त   वर्षभर विविध उपक्रम !
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

परब मराठा समाजाच्या हिरक महोत्सवा निमित्त वर्षभर विविध उपक्रम !

प्रकाशन: 08 Jan 2023 08:55 PM
वाचन संख्या 47

उपाध्यक्ष डॉ. दीपक परब यांची माहिती

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जोपासून परब मराठा समाज विविध क्षेत्रात कार्यरत आहे. २२ डिसेंबर १९६३ रोजी पांडुरंग श्रीधर परब यांनी स्थापन केलेल्या परब मराठा समाजाचा हिरक महोत्सव सन २०२३ सालामध्ये विविध उपक्रमांनी संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती परब मराठा समाजाचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर दीपक परब, सहसचिव जी एस परब, परब सहकारी पतपेढी मर्यादित च्या संचालिका सौ राधिका परब,परब मराठा समाज शिक्षण सेवा मुंबईचे सेक्रेटरीआणि परब मराठा समाज सदस्य मिलिंद प्रभू यांनी बांदिवडे येथे दिली. या बाबत प्रसिद्धीसाठी एक प्रसिद्धी पत्रकही दिले आहे .यावेळी फेब्रुवारी २०२३ पासून गावा गावातील परब बांधवांच्या गाठीभेटी घेऊन प्रत्येक गावात परब मराठा समाजाचा संपर्क अभियान सुरू करण्यात येणार आहे. या संपर्क अभियानात परब मराठा समाजाचे पदाधिकारी, समाज बांधव हे प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. यानंतर १९ मार्च २०२३ रोजी शिवाजी मंदिर दादर मुंबई येथे सकाळी दहा ते दोन या वेळात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात सहित सर्व परब बांधवांचा भव्य दिव्य कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याच बरोबर मराठा समाजातील महिलांसाठी महिला दिन सुद्धा विविध उपक्रमाने याच दिवशी संपन्न होणार आहे.जुलै २०२३ मध्ये मुंबई नजीक कार्यकर्त्यांचा मेळावा व पावसाळी महा शिबिर घेण्यात येणार आहे. या पावसाळी शिबिरामध्ये सर्व परब बांधवांनी सहभागी होणे गरजेचे आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर १४ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथे बालदिन साजरा करण्यात येणार असून यावेळी परब मराठा समाजातील बालकांसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. २२ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथे परब मराठा समाजाच्या हिरक महोत्सवाची सांगता मोठ्या धुमधडाक्यात विविध मान्यवरांच्या उपस्थित विविध उपक्रमांनी करण्यात करण्यात येणार आहे.या परब मराठा समाजाच्या हिरक महोत्सवा निमित्त इतर समाजातील सर्व ज्ञाती बांधवांना ही समाविष्ट करून घेऊन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच भविष्यात परब मराठा समाजातील मुले तसेच इतर समाजातील मुले शैक्षणिक सुविधांपासून कोणीही वंचित राहता कामा नये यासाठी परब मराठा समाज नेहमी पुढे असतो. यापुढेही कोणत्याही समाजातील मुलांनी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी परब मराठा समाजाचे माजी अध्यक्ष कै. जयवंत परब, विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री अनिल परब, उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, जी. एस. परब हे नेहमी पुढाकार घेत असून भविष्यातही या मुलांच्या मागे हे मान्यवर आणि समाज राहणार आहे याची ग्वाही सुद्धा डॉ. दीपक परब यांनी यावेळी दिली. परब मराठा समाजाची परब सहकारी पतपेढी म्हणून कार्यरत असून ही पतपेढी दादर, भांडुप, कणकवली, कुडाळ अशा चार ठिकाणी या पतपेढीच्या शाखा असून या पतपेढीच्या माध्यमातूनही दरवर्षी विविध समाजाभिमुख उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या पतपेढीला ४१ वर्ष पूर्ण झाली आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवण्यासाठी ही पतसंस्था परिश्रम घेत आहे. या पतपेढीच्या माध्यमातून समाजातील गरजूंना वेळोवेळी सुलभ कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले जात आहे. परब पतपेढी आणि परब मराठा समाजाच्या वतीने समाजातील गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येते.

या हिरक महोत्सवाचे औचित्य साधून परब मराठा समाज व इतर सर्व समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ६० गुणवंतांचा यथोचित सन्मान करणार आहे. या सर्वांना भव्य दिव्य अशा अनोख्या कार्यक्रमात परब बांधवांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत परब मराठा समाजाचा आगळावेगळा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.याबरोबरच सर्व लहान थोर घटकांना एक व्यासपीठ मिळावे म्हणून संपूर्ण वर्षभर विविध प्रकारच्या शालेय व शाळाबाह्य राज्य स्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी घेण्यात येणार आहेत. याबाबतचे अधिकृत माहिती मागवून प्रसिद्ध केली जाईल. परब मराठा समाज हा कोणत्याही पक्षाचे लेबल न वापरता गुण्यागोविंदाने काम करत आहे. भविष्यात होणारा हीरक महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होण्यासाठी परब मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी, तसेच समाजाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अनिल परब, कार्याध्यक्ष जगदीश परब, सरचिटणीस जी एस परब, खजिनदार शरद परब, जनरल सेक्रेटरी शैलेंद्र परब आणि सर्व सदस्य प्रयत्न करत आहे.परब मराठा समाजाच्या हीरक महोत्सवात परब मराठा समाजातील सर्व बांधवांनी हितचिंतक व सर्व समाजातील सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परब मराठा समाजाच्या वतीने उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, सहसचिव जी. एस. परब आणि सर्व सदस्यांनी केले आहे..

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स