ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिडवणे नं.१ शाळेत स्कुल किटचे वितरण
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिडवणे नं.१ शाळेत स्कुल किटचे वितरण

प्रकाशन: 05 Jan 2023 06:30 PM
वाचन संख्या 61

🔹दि शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे साहाय्य

🔸सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांचे सौजन्य

▪विवेक परब / ब्यूरो चिफ- नुकतेच शिडवणे नं. १ शाळेतील ५१ विद्यार्थ्यांना दि शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आर्थिक सहकार्याने व सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या सौजन्याने स्कुल किटचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते स्कुल किटचे वाटप करण्यात आले.

त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ, उपाध्यक्षा समिता सुतार, मनोहर कोकाटे, अनिल पांचाळ, दिनेश रांबाडे, तारीफ शेख, सचिन टक्के, निलेश टक्के, श्रीराम पाष्टे, मंगेश सुतार, स्नेहा पांचाळ, मुख्याध्यापक सुनिल तांबे, प्रवीण कुबल, सुजाता कुडतरकर, सीमा वरुणकर आणि पालकवर्ग उपस्थित होते.

सदर कार्यक्रम संपन्न होण्यासाठी शिडवणे कोनेवाडी येथील सचिन पाटणकर आणि प्रशांत कुडतरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याबद्दल मदतीचा हात देणाऱ्या सर्वांचे ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स