ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी हिंदू राष्ट्र जागृती सभा प्रेरणदायी ठरेल
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी हिंदू राष्ट्र जागृती सभा प्रेरणदायी ठरेल

प्रकाशन: 05 Jan 2023 05:40 PM
वाचन संख्या 28

समन्वयक हेमंत मणेरीकर यांचा पत्रकार परिषदेत दावा

बांदा /राकेश परब: भारतात अल्पसंख्यांकांसाठी सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे. मात्र हिंदूना संरक्षण देणारे मंत्रालय अथवा आयोग नाही. अल्पसंख्यांकाना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान दिले जाते. अजूनही इतर काही नवी संकटे देशासमोर आहेत. हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी हिंदू राष्ट्र जागृती सभा प्रेरणदायी ठरेल, असा दावा हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक हेमंत मणेरीकर यांनी बांदा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.    

ते म्हणाले, हिंदूंवर होणार्‍या अन्यायांवर वाचा फोडण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रविवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता बांदा येथील खेमराज हायस्कूलच्या पटांगणावर हिंदू राष्ट्र जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाड्ये, हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाड्ये मार्गदर्शन करणार आहेत. 

   ते म्हणाले, हिंदू जनजागृती समितीच्या सभेसाठी सावंतवाडी, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यासह गोव्यातही प्रसार सुरु आहे. विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, हिंदुत्वनिष्ठ व लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. सभेच्या प्रचारासाठी गुरुवार ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता बांदा शहरात वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले.       यावेळी सनातन संस्थेचे शंकर निकम, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी, सचिव, इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर, युवा उद्योजक डाॅ. नितीन मावळंकर, हिंदू जनजागृती समितीचे शिवराम देसाई, संदीप नाणोसकर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स