आई वडील, शाळेला आणि गावाला कधीच विसरू नका ; सत्यवान भोगले
साळशी हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
संतोष साळसकर | शिरगाव: साळशी हायस्कूलच्या शिक्षकांचे काम खरच खूप उल्लेखनीय आहे. त्यामुळे गेले २ वर्षे या हायस्कूल चा निकाल १०० टक्के लागत आहे. आज या प्रशालेतून गेलेले विद्यार्थी खूप मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे आताच्या मुलांनी पण त्यांचा चांगला आदर्श ठेऊन शिस्तप्रिय वागा. आपल्या आई वडिलांना, शाळेला , शिक्षकांना आणि गावाला कधीही विसरू नका.असे प्रतिपादन चाफेड गावचे माजी सरपंच सत्यवान भोगले यांनी बोलताना व्यक्त केले.
देवगड तालुक्यातील साळशी ग्रामविकास मंडळ साळशी संचलित माध्यमिक विद्यामंदिर साळशी च्या वार्षिक स्नेहसंमेलनात सकाळ सत्रात मुलांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात श्री भोगले बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुलांना विविध पारितोषिक वितरण करण्यात आले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते शारदामातेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाफेड गावचे माजी सरपंच सत्यवान भोगले, शाळा समिती चेअरमन सत्यवान सावंत, उपचेअरमन प्रभाकर साळसकर, मुख्याध्यापक माणिक वंजारे, पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, प्रकाश रावले, सरमळेवाडी शाळा मुख्याध्यापक संतोष गुरव, संजय मराठे, पुरुषोत्तम साटम, स्वप्नील भरणकर, सूरज पवार, पत्रकार प्रदीप घाडी, अंगणवाडी सेविका सौ. प्रतीक्षा शिवलकर, मदतनीस संध्या नाईक, मनाली नाईक, विद्यार्थी प्रतिनिधी रोहित महाजन, मानशी लाड, सांस्कृतिक प्रतिनिधी रिया भोगले आदींसह विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रात्रौ ८.३० वाजता मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम, बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहेत. यावेळी सूत्रसंचालन आणि आभार पुरुषोत्तम साटम यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)