दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात चौथा!
मसुरे| प्रतिनिधी: हदेवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचा विद्यार्थी दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजितपूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी सर्वसाधारण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा शासनाच्या संकेत स्थळावर गुणवत्ता यादी जाहीर झाली. यामध्ये दक्षेश मांजरेकर याने ८८.५९ % गुण पटकाऊन गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. जुलै २०२२ मध्ये ही परीक्षा झाली होती. दक्षेश हा सहावीत शिकत आहे. यापूर्वी त्याने मंथन टॅलेंट, बिडीएस स्पर्धेत राज्यस्तरावर यश प्राप्त केले आहे. तसेच तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विविध स्पर्धेत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल दक्षेश व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, मुख्याध्यापिका एम. बी. कुंज, व्यवस्थापक आबा पुजारे, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, सरपंच सौ. साक्षी गुरव, पोलीस पाटील सौ. साक्षी सावंत, सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)