ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण तालुक्यातील ४५ शेतकरी अभ्यास दौऱ्यात सहभागी ; सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन.

मालवण तालुक्यातील ४५ शेतकरी अभ्यास दौऱ्यात सहभागी ; सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन.

प्रकाशन: 03 Jan 2023 09:05 PM
वाचन संख्या 156

मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण व कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना अर्थात UNDP-GCF अंतर्गत शेतकरी अभ्यास दौरा औरंगाबाद सिल्लोड येथे आयोजित करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण येथून निघून 2 जानेवारी ते 5 जानेवारी असा चार दिवसाचा भेट कार्यक्रम आहे.

यामध्ये औरंगाबाद सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पाहणे, राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध उपक्रमांची पाहणी व माहिती घेणे. प्रगत शेतकरी यांना भेटी, सुधारित तंत्रज्ञानाची माहिती घेणे, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये बहुसंख्येने विविध प्रकारचे स्टॉल उभारणी, विविध प्रकारची प्रात्यक्षिके,आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग,शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसेच विविध विषयावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यांचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा ह्या उद्देशाने शेतकरी अभ्यास दौरा आयोजन करण्यात आलेला आहे. यामध्ये तालुकास्तरावरून तालुक्यातील 45 शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी कार्यालय मालवण यांच्या वतीने असुन UNDP-GCF यांच्या अर्थसाहयाने आयोजित आहे. दौऱ्यामध्ये बदनापूर कडधान्य संशोधन केंद्र येथील विविध उपक्रमांची माहिती घेतली जाणार आहे. परतीच्या प्रवासात कोल्हापूर कनेरी मठ येथील सेंद्रिय शेतीचे उपक्रमाची माहिती घेणे.अशा विविध उपक्रमांची माहिती शेतक-यांना सदरील दौ-यात होणार आहे.तरी इतर शेतकरी यांनी राज्य स्तरीय कृषि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत कळविण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी श्री विश्वनाथ गोसावी यांनी श्रीफळ फोडून शुभारंभ केला, यावेळी कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स