ढाका येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कुंभवडे येथील सृष्टी चव्हाणची सुवर्ण कामगिरी..!
मसुरे | प्रतिनिधी : बांग्लादेश मधील ढाका येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बी जी कराटे चॅम्पियनशिपमध्ये मूळ वैभववाडी तालुक्यातील कुंभवडे येथील सृष्टी संजय चव्हाण या १३ वर्षाच्या मुलीने सुवर्ण कामगिरी बजावली आहे. तिने कुमीते या प्रकारात गोल्ड मेडल तर टीम काता मध्ये ब्रॉंझ पदक प्राप्त केले आहे. अंधेरी येथील सेंट झेवीयर्स हायस्कुल मध्ये नववी इयतेत शिकणाऱ्या सृष्ठी हिला धीरज पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश आणि भारत या देशातील सुमारे ७५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये सृष्टी सह मुंबईतील ११ स्पर्धकांनी भाग घेत जबरदस्त कामगिरी केली. कोच धीरज पवार यांच्या नेतृत्त्वात मुंबईतील स्पर्धकांनी ११ गोल्ड, ६ सिल्व्हर आणि ७ ब्रॉन्ज मेडल्स पटकावले. सृष्टी हिच्या सुवर्ण यशाबद्दल प्रशाला, तसेच गावात अभिनंदन होत आहे. मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, मुणगे पोलीस पाटील सौ. साक्षी गोविंद सावंत यांची ती भाची आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)