साळशी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
शिरगाव | संतोष साळसकर: आमदार नितेश राणे यांचा प्रयत्नातून साळशी गावातील मंजूर असलेल्या विविध विकास कामाचे भूमिपुजन २७ डिसेंबर रोजी करण्यात आले.
डोंगरी विकास निधी मधून साळशी ग्रामपंचायत विस्तारीकरण करणे यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर असून याचे भूमिपूजन माजी जि प सदस्य सुभाष नार्वेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच डोंगरी विकास मधून साळशी देवणेवाडी अंगणवाडी इमारत बांधणे यासाठी १२ लाखाचा निधी मंजूर असून त्याचे भूमिपूजन ग्रामस्थ शांताराम रावले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच डोंगरी विकास मधून आपटापार ते पोस्ट ऑफिस पर्यंत रस्त्याचे खडीकरण व डाबंरीकरण करणे यांचे भूमिपूजन ग्रामस्थ मानसिंग लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच जिल्हा क्रीडा विभागामार्फत साळशी येथे व्यायाम शाळा इमारत बांधणे यासाठी सात लाख हजार रुपयांचा निधी मंजूर असून माजी उपसरपंच अनंत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच जलजीवन मिशन अंतर्गत,साळशी नळ योजना विस्तारीकरण करणे यासाठी ३१ लाख ७७ हजार मंजूर असून याचे भूमिपूजन सरपंच वैभव साळसकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जल जीवन मिशन अंतर्गत साळशी धनगरवाडी नळयोजना मंजूर असून त्यासाठी २१लाख १८ हजार रुपये मंजूर असून ग्रामस्थ जयसिंग गावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यावेळचे सरपंच वैभव साळस्कर , उपसरपंच अनंत नाईक माजी जि.प. सदस्य सुभाष नार्वेकर ग्रा प सदस्य वैशाली गावकर, रजनी घाडी, हर्षल साळस्कर, नम्रता माळवदे, प्रकाश किंजवडेकर विनायक गावकर रमेश खरात, बापू खरात ,मनाली मिराशी, धनराज मिराशी, नंदकुमार गावकर, प्रकाश किजवडेकर, महेश गावकर ,निखिल मिराशी ,शैलेंद्र गावकर , अजय शंकरदास ,प्रतीक पाटणकर,संजय लाड, राजेंद्र साटम आदी उपस्थित होते
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)