ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
इनोव्हा गाडीला कासार्डेत भीषण अपघात ; चालकासह चार प्रवासी जखमी.

इनोव्हा गाडीला कासार्डेत भीषण अपघात ; चालकासह चार प्रवासी जखमी.

प्रकाशन: 29 Dec 2022 10:42 AM
वाचन संख्या 81

संतोष साळसकर | सहसंपादक :
देवरुख वरुन तोंडवळी ता. मालवण या ठिकाणी निघालेल्या इनोव्हा गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर कासार्डे  येथे भीषण अपघात होऊन चालकासह चार प्रवासी जखमी झाले असून यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

हा अपघात कणकवली तालुक्यातील कासार्डे पेट्रोल नजीक सायंकाळी ५ वाजता झाला.गाडीतील सर्व प्रवासी हे तोंडवळी ता. मालवण येथे विनायक परब  यांच्या घरी इनोव्हि एम.एच. ४६ एम.१०३३ या गाडीने निघाले होते.

जखमींमध्ये प्रवासी विनायक परब वय ३०वर्षे रा. तोंडवळी ता. मालवण ,वसंत गूरव वय- ५०,रा. मुंबई, मुळ गाव देवरुख जि. रत्नागिरी,त्यांची पत्नी सौ.साक्षी वसंत गूरव- रा. मुंबई, वय वर्षे- ४०, मुलगी -कु. भुमी वसंत गूरव वय.,१४ वर्षे व चालक असे मिळून ५ प्रवासी प्रवास करीत होते.

 सदर इनोव्हा गाडी कासार्डे पेट्रोल पंपानजीक आल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या पुर्वेला सुरक्षतेसाठी असलेले जवळपास ८ते ९ रेलिंग तोडत  पाच फुट गाडी  आनंदनगर रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर पडली.नेहमीच वर्दळ असलेल्या या ठिकाणी सुदैवाने या दरम्यान सर्व्हिस रोडवर कोणतेही वाहन अथवा प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

 तात्काळ ग्रामस्थ रविंद्र पाताडे,गोट्या पाताडे, समीर मुणगेकर,माजी सरपंच संतोष पारकर, पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर,श्री. राणे,सागर पाताडे,आबा मेस्त्री, गणेश कोलते,
उपसरपंच-गणेश पाताडे व इतर लोकांनी धाव घेऊन जखमींना गाडी बाहेर काढून  रुग्णालयात दाखल केले.
तसेच पोलीस दुरक्षेत्र कासार्डेचे पो.हवालदार चंद्रकांत झोरे, महामार्गाचे पोलिस हवालदार  ए.बी.सावंत,विजय देसाई,ए.जी. सानप यांनी घटनास्थळी धाव‌ घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी मोकळा केला.

 याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.या अपघातातील जखमींना उपचारासाठी कणकवली येथे  दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स