जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थीनींचे विभागीय टे.टे. स्पर्धेत यश..!
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल च्या १४ वर्षीय मुलींचा संघ राज्यस्तरीय टेबल टेनीस स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
सावंतवाडी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेत कु. आर्या दिघे, कु. प्राची चव्हाण, कु. वर्षा परुळेकर, या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला . कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करण्याचा मान मुलींच्या या संघाला मिळाला असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री कोरगांवकर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच त्यांना श्री राणे श्री पराडकर यांचे सहकार्य लाभले .
या यशस्वी विद्यार्थिनींचे मालवण एज्युकेशन सोसायटी आणि जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्गाकडून तसेच शहरातून अभिनंदन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)