ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालडी गावच्या सौ. आकांक्षी संदीप मुळेकर राष्ट्रीय प्रेरणा ज्योती पुरस्काराने सन्मानित..!

मालडी गावच्या सौ. आकांक्षी संदीप मुळेकर राष्ट्रीय प्रेरणा ज्योती पुरस्काराने सन्मानित..!

प्रकाशन: 27 Dec 2022 02:57 PM
वाचन संख्या 101

विवेक परब | मुख्य संपादक :
स्वर्गीय हरिश्चंद्र फाऊंडेशन (रजि.), निसर्गाश्रम प्रकल्प महाराष्ट्र राज्य आणि अनुज इंटरप्राईजेस (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी देण्यात येणारे अत्यंत मानाचे व प्रतिष्ठेचे राष्ट्रीय समाज भूषण सन्मान पुरस्कार व राष्ट्रीय प्रेरणा ज्योती पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार पंढरपूर या ठिकाणी रविवार दिनांक २५ /१२/२०२२ रोजी सन्मानपूर्वक सोहळ्यात प्रदान करण्यात आले.

Article image

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालडी गावच्या सुनबाई आणि जय भवानी प्रसारक मंडळ संचालित मिलिंद विद्यालय पवई, मुंबई -८० च्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आकांक्षी संदीप मुळेकर मॅडम यांना ,त्यांनी गेली तीस वर्ष शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे या वर्षीच्या राष्ट्रीय प्रेरणा ज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौ. आकांक्षी संदीप मुळेकर मॅडम यांचे विविध स्तरातून कौतुक आणि हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स