ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जेष्ठानी आरोग्याबाबत वेळीच खबरदारी घ्यावी- अशोक कांबळी यांचे प्रतिपादन.

जेष्ठानी आरोग्याबाबत वेळीच खबरदारी घ्यावी- अशोक कांबळी यांचे प्रतिपादन.

प्रकाशन: 27 Dec 2022 11:07 AM
वाचन संख्या 104

हडी जेष्ठ नागरीक संघाचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा..!

Article image

मसुरे | प्रतिनिधी :
जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून जेष्ठांनि एकमेकांच्या समस्या सोडवाव्यात. जेष्ठ ग्रामस्थांनी आरोग्य बाबत वेळीच खबरदारी घ्यावी. योगासन, प्राणायाम अत्यावश्यक आहे. कुटूंबात तुमचा मान राखला जावा यासाठी विविध घटकांशी तुमचे संबंध चांगले ठेवा. सर्वांना समजून घेण्याची जबाबदारी तुमची आहे. असे प्रतिपादन आचरा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी हडी येथे केले.

Article image

फेस्कोम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या पंधराव्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाला. यावेळी अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले,दिलीप करंदीकर, उमेश हडकर, सूर्याजी पाटील, मनाली फाटक, सौ संपदा परब, डॉ.संदीप कदम, सौ रूपा सांडव, ग्राम.सदस्य भरत लाड, सुवासिनी वाळवे, प्रज्ञा सुर्वे, प्राची मयेकर,दीक्षा गावकर, कीर्तनकार हृदयनाथ गावडे, उपाध्यक्ष रामचंद्र हडकर, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, सल्लागार चंद्रकांत पाटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Article image
Article image


यावेळी सरपंच प्रकाश तोंडवळकर यांनी शुभेच्छा दिल्या. सल्लागार चंद्रकांत पाटकर यांनी प्रास्ताविक करताना जेष्ठां साठी अनेक योजना आहेत त्याचा लाभ घ्या.मासिक सभेला जास्तीत जास्त सदस्यांनी उपस्थित रहावे. गावातील विविध समस्यावर जेष्ठ नागरिक संघाकडून निश्चित पणे आवाज उठवण्यात येईल असे सांगितले. यावेळी संघाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य, वैवाहिक जीवनाची ५० वर्ष पूर्ण केलेल्या सौ. सुनंदा देऊ भोजने या दाम्पत्याचा तसेच ७५ वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

Article image


तसेच दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभागी होणाऱ्या आचरा कॉलेजच्या संघातील सर्वांचा सन्मान करण्यात आला.जेष्ठ ग्रामस्थां साठी हभप हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन झाले.त्यास संगीत साथ दुर्वांक गावडे व आनंद परब यांनी केली. यावेळी उपसचिव रमाकांत सुर्वे, कोषाध्यक्ष मोहन घाडीगांवकर, लेखापाल प्रभाकर तोंडवळकर, दिनकर सुर्वे, शांताराम साळकर, सदस्य गणू परब, गणेश परब, शंकर पाटील, जानू कदम, सौ प्रज्ञा तोंडवळकर, रमेश कावले, सौ. वनिता हडकर, सौ. मनीषा पोयरेकर, श्रीधर परब, प्रभाकर चिंदरकर आदी उपस्थित होते. स्वागत श्रीमती चंद्रकला कावले, आभार सुभाष वेंगुर्लेकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स