ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण बाजारपेठेतून आठवडाभरासाठी एस.टी.वाहतूक थांबवली ; पर्यटन हंगाम लक्षात घेता निर्णय घेतल्याचे एस.टी.प्रशासनाने केले स्पष्ट.

मालवण बाजारपेठेतून आठवडाभरासाठी एस.टी.वाहतूक थांबवली ; पर्यटन हंगाम लक्षात घेता निर्णय घेतल्याचे एस.टी.प्रशासनाने केले स्पष्ट.

प्रकाशन: 26 Dec 2022 01:21 PM
वाचन संख्या 72

मालवण | ब्यूरो न्यूज : नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मालवणात पर्यटकांची गर्दी लक्षात घेता तथा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज सोमवार २६ डिसेंबर पासून बाजारपेठेतून एसटी वाहतूक २ जानेवारी पर्यंत बंद ठेवून अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. प्रवाशांनी यांची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी केले आहे.

मालवणात सध्या पर्यटकांची गर्दी असून बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे येथून एसटी मार्गस्थ करणे चालकांना अशक्य होत होते. लहान मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटन हंगाम संपेपर्यंत बाजारातून बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आचरा, हडी, सर्जेकोट, कांदळगाव सह या मार्गांवरील अन्य एसटी बसेस सागरी महामार्गांवरून मार्गस्थ होतील. २ जानेवारी पासून एसटी वाहतूक बाजारातून पूर्ववत सुरु होईल, अशी माहिती आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स