ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत सरपंच व ग्रा. पं. सदस्य यांचा सत्कार.

मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत सरपंच व ग्रा. पं. सदस्य यांचा सत्कार.

प्रकाशन: 26 Dec 2022 01:28 PM
वाचन संख्या 108

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाला सत्कार ; अनेक उच्चस्तरीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

Article image

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या’ नवनिर्वाचित सरपंच, ग्रा. पं. सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते वायरी येथील आर जी चव्हाण सभागृहात करण्यात आला.

यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते संदेश पारकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, यतीन खोत, मंदार ओरसकर, भाई कासवकर, बाळ महाभोज, शिल्पा खोत, दिपा शिंदे, बाबा सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, अरुण लाड, कमलाकर गावडे, बंडू चव्हाण, पिंट्या गावकर, विजय नेमळेकर, अमित भोगले, तपस्वी मयेकर, नरेश हुले, गणेश तोंडवळकर, समीर लब्दे, चंद्रकांत गोलतकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी आ. नाईक म्हणाले, लोकप्रतिनिधी झाल्यास अनेक ऑफर येत असतात. मात्र ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे, त्याचा कधीच विश्वासघात करायचा नसतो. मलापण आमदार असल्यामुळे ५० कोटींची आणि मंत्रीपदाची ऑफर आली होती. ठाकरे कुटुंबिय आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांना त्रास देण्याचे षडयंत्र सध्या राज्यात सुरू आहे. कितीही दबाव आला तरी आपण उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे राहणार आहोत. मी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असून त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या शक्तीवर आज आमदार बनलेलो आहे, असे सांगून निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे काय यासाठी भाई गोवेकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.

ग्रा. पं. निवडणुकीत भाजपाकडून शिवसेनेच्या उमेदवारांना फोडण्यासाठी थेट वैयक्तीक पातळीवर त्रास दिला गेल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. सरपंच पदाच्या उमेदवारांनी आणि सदस्यांनी दबावाला बळी न पडता त्यांच्या पाठिशी स्थानिक शिवसैनिक राहिल्याने त्यांनी विरोधकांना जागा दाखवून दिली. रेवंडी, तोंडवळी याठिकाणी काही वाळू व्यावसायिकांना धमकी देण्यात आली. कोळंब सरपंच यांना तर थेट ब्युटीपार्लर घालून देण्याचीही ऑफर देण्यात आली यातून भाजपला सत्तेची मस्ती आल्याचे दिसून येत आहे. सर्व निवडणूका पैशांच्या जोरावर जिंकू ही त्यांची मानसिकता आता मतदारांनी मोडून काढली आहे, असे ते म्हणाले.

Article image

यावेळी कांदळगाव, कोळंब, रेवंडी, असरोंडी, राठिवडे, रामगड, श्रावण, बुधवळे कुडोपी, ओवळीये, वायंगणी, बांदिवडे, तोंडवळी, तळगाव, साळेल, वायरी भूतनाथ या १५ गावच्या सरपंच, सदस्य आणि गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्य गावातील शिवसेनेच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेने सोबत २१ सरपंच असून गाव पॅनल मधील आणखी काही सरपंच सोबत येतील असा दावा आमदार वैभव नाईक यांनी या कार्यक्रमात केला. तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत १०० टक्के यश मिळवण्याचा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स