ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जिल्हास्तरीय तायक्वांदो शालेय क्रीडा स्पर्धा २०२२- २३ मध्ये निशा सोलकरला गोल्ड मेडल..!

जिल्हास्तरीय तायक्वांदो शालेय क्रीडा स्पर्धा २०२२- २३ मध्ये निशा सोलकरला गोल्ड मेडल..!

प्रकाशन: 25 Dec 2022 12:22 PM
वाचन संख्या 68

निशा सोलकर मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या..

मसुरे | प्रतिनिधी :
महर्षी दयानंद कॉलेज परेल ची इयत्ता ११ वी कॉमर्स ची विद्यार्थिनी आणि चिल्ड्रन्स तायक्वांदो अकादमी मध्ये प्रशिक्षण घेणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या निशा प्रमोद सोलकर हिने दिनांक 19 ते 21 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2022 या कालावधीत भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल धारावी मुंबई येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो शालेय क्रीडा स्पर्धा http://localhost/news/public/uploads/2022- 23 मध्ये 63 किलो मुलींच्या वजनी गटामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई श्री अभय चव्हाण तसेच मुंबईचे अध्यक्ष भास्कर करकेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत निशा हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद मुंबई शहर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्यावतीने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.

निशा सोलकर हिने यापूर्वीही अनेक जिल्हा,राज्यस्तरीय तसेच आंतरराज्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेली आहेत. निशा सोलकर ही चिल्ड्रन्स तायक्वांदो अकादमी मुंबई परेल येथे प्रशिक्षण घेत असून तिला मुख्य प्रशिक्षक म्हणून सिद्धेश जाधव, संकेत भोसले, सुदेश पवार सर कॉलेज चा वतीने मनोज पाटील सर, निकिता पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच निशा हिला तिचे वडील प्रमोद सोलकर आणि आई पूजा सोलकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. निशा सोलकर हीने विविध नृत्य स्पर्धेमध्ये सुधा प्रथम क्रमांक प्राप्त केले असून महिलांच्या दशावतार मध्येही तिने मोलाची कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल महर्षी दयानंद कॉलेज परेल च्या वतीने विशेष अभिनंदन केले आहे. याबरोबरच रामगड, मसुरे गावातही तिचे कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स