ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
देवगडमध्ये ३० व ३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी " जल्लोष कार्यक्रम "

देवगडमध्ये ३० व ३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी " जल्लोष कार्यक्रम "

प्रकाशन: 25 Dec 2022 11:49 AM
वाचन संख्या 68

तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचा उपक्रम.

संतोष साळसकर | शिरगांव :
देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या जल्लोष समितीची सभा संस्थेच्या कार्यालयात उपाध्यक्ष श्रीपाद पारकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी ३० व ३१ डिसेंबर होणाऱ्या जल्लोष कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाद पारकर, सचिव आहेत. संजय धुरी, खजिनदार मधुकर नलवडे, सहखजिनदार मिलिंद मोर्ये, शैलये कदम विजय उर्फ बंटी कदम, सुनिल पारकर, शामराव पाटिल, अनिल कोरगांवकर, दयाळ गांवकर, दिनेश पारकर, संतोष कुबडे, मिलिंद मोहिते, मिलिंद खडपकर, दिनेश पटेल, लहरीकांत पटेल, जितेंद्र भानुशाली, ओंकार कुबडे, सुजीत बोंडाळे, दया पाटील, प्रफुल पटेल, प्रविण सावंत इत्यादी सभासद उपस्थित होते.

शुक्रवार, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ३.३० वा. शालेय विद्यार्थ्यासाठी चित्रकला

स्पर्धा घेण्याचे ठरले, स्पर्धा ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी या दोन गटांत घेण्यात येईल. यासाठी ५ वी ते ७ वी गट प्रथम ७०० रु. द्वितीय ५००रु., तृतीय ३००रु. अशी रोख बक्षिसे व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. ८ वी ते १० वी गटासाठी प्रथम १०००रु., द्वितीय ७००रु. व तृतीय ५०० रु. आणि विजेत्यांसाठी प्रशस्तिपत्रक अशी बक्षिसे

वाळू शिल्प स्पर्धेसाठी २९ डिसेंबर पर्यंत सर्व कलकारांनी आपआपली वाळू शिल्प तयार करावयाची आहेत. वाळू शिल्पासाठी संबंधीतांनी मृत्युंजय मुणगेकर ( जामसंडे हाय.) व दर्शन सुतार, देवगड तसेच मधुकर नलवडे यांच्याशी संपर्क साधावा. शुक्रवार ३० डिसेंबर रोजी सायं. ६ वा. स्थानिक कलाकारांचे कराओके साँग्ज व रेकॉर्ड डान्स होतील. सहभागासाठी विजय उर्फ बंटी कदम यांच्याशी संपर्क करावा.

३१ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. जल्लोष कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. सायंकाळी

७.३० वा. उद्घाटनपर नृत्य आविष्कार सादर होईल. सायं. ८.३० वा. सोनी मराठी वाहिनी वरील छोट्या बयोची मोठी स्वप्न मालिकेतील बाल कलाकार अनुष्का पोकळे, शौरीन देसाई, विद्याधर कार्लेकर यांचा सत्कार करण्यात येईल. रात्री ९ वा. नागेश कडू प्रस्तुत सेलिब्रिटी नाईट. यामध्ये जुन्या नव्या गीतांसह धडाकेबाज नृत्याविष्कार सादर होईल. त्याचबरोबर झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या, दादागिरीमधील न्यू दादा कोंडके, हास्यसम्राट लाफ्टरनॅलेंज फेम टिव्ही, स्टेज आर्टिस्ट राहुल कुमार मिमिक्री आर्टिस्ट म्हणुन या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. रात्रौ १२ वा. फटाक्यांची आतषबाजी होईल आणि नववर्षाच स्वागत होईल. लहानांसाठी छोटे छोट गेम्स असतील शिवाय खवय्यांसाठी वेगवेगळ्या फूडस्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. अशा या दिमाखदार कार्यक्रमाचा पर्यटकांनी तसेच सर्वांनी पुरेपूर आस्वाद घ्यावा, असे आवाहन जल्लोष समितीने केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स