ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित रंगभरण स्पर्धेत अंगणवाडी मसुरेची विद्यार्थीनी निधी दिपक पेडणेकर हिला सुवर्णपदक..!

रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई आयोजित रंगभरण स्पर्धेत अंगणवाडी मसुरेची विद्यार्थीनी निधी दिपक पेडणेकर हिला सुवर्णपदक..!

प्रकाशन: 25 Dec 2022 12:28 PM
वाचन संख्या 78

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड…

मसुरे | प्रतिनिधी : रंगोत्सव सेलिब्रेशन ही राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर, रंगभरण, टॅटू मेकिंग, कार्टून मेकिंग अशी कला स्पर्धा मुलुंड मुंबईच्या रंगोत्सव संस्थेमार्फत आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये अंगणवाडी मसुरे गडघेरा ची विद्यार्थिनी निधी दीपक पेडणेकर हिने रंगभरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तिची पुढील राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली.

निधी पेडणेकर हिला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निधी हिला विनोद कदम, अंगणवाडी शिक्षिका श्रीम. नंदा सावंत मॅडम, अंगणवाडी सहाय्यक बागवे मॅडम,केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, श्रीमती मगर मॅडम, श्रीयुत गावडे सर, उमेश खराबी सर, विनोद सातार्डेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
आणि शाळेतील सर्व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर, उद्योजक डॉक्टर दीपक परब, अखिल भारतीय कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी, उद्योजक दीपक सावंत, समाजसेवक नंदू परब, मर्डे सरपंच संदीप हडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, सौ सरोज परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, गायत्री ठाकूर, महेश बागवे, विलास मेस्त्री, उपसरपंच पिंट्या गावकर माजी उपसरपंच अशोक बागवे यांनी अभिनंदन केले आहे. निधी हिला आई ज्योती पेडणेकर, वडील दीपक पेडणेकर,वैभवी पेडणेकर, रेश्मा झुंजार पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स