ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते परबवाडा येथील नवनिर्वाचित सरपंच सदस्य व माजी सदस्य यांचा सत्कार.

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते परबवाडा येथील नवनिर्वाचित सरपंच सदस्य व माजी सदस्य यांचा सत्कार.

प्रकाशन: 25 Dec 2022 10:30 AM
वाचन संख्या 80

भाजपचे सरपंच पदासहीत सातही ग्रामपंचायत सदस्य बहुमताने आले निवडून.

विवेक परब | मुख्य संपादक :
वेंगुर्ला परबवाडा ग्रामपंचायत मध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरपंच व सर्व सदस्य निवडून आल्याने भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सर्व उमेदवारांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. परबवाडा येथे तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरपंच पपु परब यांनी गेली पाच वर्षे सरपंच पदाची यशस्वी कारकीर्द करून पुन्हा एकदा निवडुन आल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच उपसरपंच हेमंत गावडे व संतोष गावडे हे सुद्धा पुन्हा एकदा विजयी झाल्या बद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ. शमिका बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य-
कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, सुहीता हळदणकर, स्वरा देसाई या विजयी उमेदवारांचा सन्मान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्ऊ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, ज्ञानेश्वर केळजी, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, बुथ अध्यक्ष संजय मळगावकर, माजी सरपंच इनासिन फर्नांडीस, उभादांडा माजी सरपंच देवेंद्र डीचोलकर, माजी ग्रा. सदस्य अर्चना परब, अनिल गवंडे, अजित गवंडे, सुनील परब, कांता देसाई, उदय सावंत, सचिन सावंत, अक्षय परब, सुवर्णा सावंत, सरिता परब, गायचोर मॅडम उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स