मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करण्यासाठी विशेष बाब म्हणून १२ कोटींचा निधी मंजूर.
मुंबई | ब्यूरो न्यूज :
मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत करण्यासाठी विशेष बाब म्हणून १२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तातडीने दुरूस्तीला सुरूवात करण्यात येणार आहे. खड्डे भरण्यात कामचुकारपणा करणार्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक यशवंत घोटकर यांनी येथे दिले.
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी रायगडपासून आंदोलनाचा इशारा देताच राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आली आहे. या विभागाने संयुक्त बैठक घेवून चौपदरीकरणाचे काम जानेवारीत नव्याने सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. महामार्गाचे काम सुमारे ११ वर्षे रखडले आहे. सध्या महामार्गाची दुरवस्था आहे. पनवेल ते संगमेश्वरदरम्यान या टप्प्यात भलेमोठे खड्डे पडले आहेत. पेण ते कोलाड, तिसे रस्ताच उध्वस्त झाला आहे. रस्त्यावरील साधे खड्डे भरून हा मार्ग सुस्थितीत करण्यास एनएचआयला सपशेल अपयश आल्याने वाकणनाका येथे अभिनव मार्गाने भजन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)