ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
नट वाचनालयात कै. शांताराम कमळाजी नाडकर्णी व कै.शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

नट वाचनालयात कै. शांताराम कमळाजी नाडकर्णी व कै.शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 24 Dec 2022 07:58 PM
वाचन संख्या 50

बांदा | राकेश परब :
नट वाचनालयात कै. शांताराम कमळाजी नाडकर्णी व कै. शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित शालेय वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पाचवी ते सातवी प्राथमिक गटात प्रज्ञा तुषार मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) तर आठवी ते दहावी या माध्यमिक गटात वैष्णवी अशोक वाडकर (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

प्राथमिक गटात नैतिक निलेश मोरजकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा, बांदा नंबर १), वेदांत संदीप सावंत (खेमराज हायस्कुल, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या गटात प्रणिता गोविंद सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली), सुस्मिता सुनील सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. माध्यमिक गटात ओम विजय परब (विलवडे हायस्कुल, विलवडे), हिमांशू अरुण रेडकर (खेमराज हायस्कुल, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या गटात गायत्री जयराम पालव (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली) हिला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.

स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत सावंत व महाबळेश्वर सामंत यांनी केले. तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन नूतन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. पारितोषिकांचे वितरण नूतन ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, जावेद खतीब, सदस्या रुपाली शिरसाट, श्रेया केसरकर, वाचनालयचे अध्यक्ष एस आर सावंत, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, परीक्षक चंद्रकांत सावंत, महाबळेश्वर सामंत, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, संचालक निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिक्षिका रीना मोरजकर, चित्रलेखा नाईक, श्वेता मोर्ये, तुषार मोर्ये, प्रवीण परब आदी उपस्थित होते. आभार राकेश केसरकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स