सावंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन.
बांदा | राकेश परब :
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक ८ जानेवारी रोजी सावंतवाडी तालुक्यातील रायाचे पेड प्राथमिक शाळेत करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी शिक्षण विस्तार अधिकारी शुभांगी देशपांडे-होळीकर भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आजगाव प्रभागाच्या विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, संतोसे केंद्रप्रमुख श्रद्धा महाले, माजी केंद्रप्रमुख रवींद्र गवस, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, पत्रकार निलेश मोरजकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात गुणवंत विद्यार्थी गौरव, शिक्षक, पाल्य सन्मान, सेवानिवृत्त शिक्षक सन्मान तसेच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, आदर्श शिक्षक, आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत.
उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण कुंभार, सचिव धोंडी वरक, मुख्याध्यापिका सचला आरोलकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)