ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात खबरदारीच्या उपाययोजना..!

अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात खबरदारीच्या उपाययोजना..!

प्रकाशन: 24 Dec 2022 06:07 PM
वाचन संख्या 52

मंदिरात मास्क वापरणे बंधनकारक.

स्वामी भक्तांनी सहकार्य करावे : अध्यक्ष महेश इंगळे

मसुरे | प्रतिनिधी :
कोरोना महामारीचे संकट पुन्हा एकदा जगावर घोंगावत असताना कोरोनाला रोखण्यासाठी पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये याकरिता अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने पूर्णपणे खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली आहे.

शासनाच्या आवाहनास अनुसरून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना मास्कचे वाटप शुक्रवारी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना इंगळे म्हणाले, दोन वर्षात आपल्याला अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. पुन्हा जागतिक पातळीवर प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही सूचना केलेल्या आहेत, त्यास अनुसरून मंदिरास येणाऱ्या सर्व स्वामीभक्तांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व स्वामीभक्तांनी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. या पुढील काळात काही दिवस येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भाविकांना सोशल डिस्टन्सला अनुसरून टप्प्या-टप्प्याने दर्शनास सोडण्याचे नियोजन, मंदिरात प्रवेश करत असताना भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले असून या कामी अमर पाटील यांच्या समीक्षा मेडिकलचे विशेष सहकार्य लाभले आहे. येणाऱ्या सर्व स्वामीभक्तांनी प्रशासनाच्या व मंदिर समितीच्या सूचनांचे पालन वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर करण्याचे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे. आता नाताळ सुट्ट्या व नूतन वर्षाच्या सुरुवातीला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता हे नियोजन करण्यात आल्याचे इंगळे यांनी सांगितले.

याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, सागर गोंडाळ, अमर पाटील, प्रसाद सोनार, गुंजले आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स