फुकेरी येथील किल्ले हनुमंतगड येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जीर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन…!
बांदा | राकेश परब :
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जीर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन फुकेरी येथील किल्ले हनुमंतगड येथे रविवार दिनांक २५ रोजी करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी माजी खासदार डॉ. निलेश राणे, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, भाजपचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुधीर दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १० वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याला शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व दुर्गसेवक, सह्याद्री प्रतिष्ठान आणि श्री देवी माऊली सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ फुकेरी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)