ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ख्रिस्ती बांधवांच्या शांतता फेरीत सहभागी होत दिल्या नाताळच्या शुभेच्छा….!

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ख्रिस्ती बांधवांच्या शांतता फेरीत सहभागी होत दिल्या नाताळच्या शुभेच्छा….!

प्रकाशन: 24 Dec 2022 05:53 PM
वाचन संख्या 70

विवेक परब | मुख्य संपादक : नाताळचे औचित्य साधून ख्रिस्ती बांधवांकडून येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमीत्त शांतता फेरीचे आयोजन केले जाते. यामध्ये येशुच्या प्रेमाचा आणि शांततेचा संदेश दिला जातो. या माध्यमातून परस्परातील राग, मस्तर विसरला जावा आणि सर्वांमध्ये आपुलकी, प्रेम नांदावे व यातूनच परीसरामध्ये सर्वत्र शांतता नांदेल, हा येशुचा संदेश देण्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने फेरीचे आयोजन केले जाते.

वेंगुर्ले भाजपचे तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सायमन आल्मेडा यांच्या माध्यमातून परबवाडा- मासुरेवाडी येथे शांतता फेरीचे आयोजन केले होते, यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली या फेरीत सहभागी होत ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर, परबवाडा सरपंच पपु परब, उपसरपंच हेमंत गावडे, माजी सरपंच ईनासीन फर्नांडीस उपस्थित होते.

या फेरीमध्ये शिरील आल्मेडा, निकलस फर्नांडीस, विल्सन फर्नांडीस, दुवाट फर्नांडीस, वाॅल्टर डिसोझा, पारपीट डिसोझा, आना डिसोझा, ग्लॅसीस फर्नांडीस, आल्मेडा इत्यादी ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स