करवंटीपासून बनणाऱ्या वस्तूंची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती.
विवेक परब | मुख्य संपादक :
देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या इंडस्ट्रीयल व्हिजिट सहली दरम्यान मालवण मेढा येथील भूषण मेतर यांच्या घरी भेट देऊन मेतर यांनी नारळाच्या करवंटी पासून बनविलेल्या वस्तूंची माहिती घेतली.
मालवण मेढा येथील भूषण मेतर हे नारळाच्या करवंटीपासून विविध आकर्षक व नाविन्यपूर्ण वस्तू बनवितात. यामध्ये शोभिवंत तसेच वापरायोग्य वस्तूंचा समावेश आहे. देवगड येथील केळकर महाविद्यालयाच्या बँकिंग इन्शुरन्स शाखेच्या ४० विद्यार्थ्यांनी आपल्या इंडस्ट्रीयल व्हिजिट सहली दरम्यान श्रीधर काळे यांच्या माध्यमातून भूषण मेतर यांच्या घरी भेट देऊन करवंटी वस्तूंबाबत व्यवसायिक दृष्टिकोनातून माहिती घेतली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयाच्या प्रा. सौ. रश्मी हिर्लेकर, प्रा. शामली तारी उपस्थित होत्या.
यावेळी भूषण मेतर यांनी ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ या धर्तीवर बनविण्यात येणाऱ्या करवंटी वस्तूंबाबत माहिती दिली. करवंटी पासून आकर्षक वस्तू कशा बनवितात, आवश्यक असणारी कल्पकता तसेच ील व्यावसायिक संधी याबाबतही मेतर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)