ह्युमन राईटस् असोशिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग आणि लायन्स आय हॉस्पिटल, कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने माळगांव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर…!
प्रसन्ना पुजारे | सहसंपादक :
मालवण तालुक्यातील माळगांव येथे दिनांक- ३१/१२/२०२२ रोजी ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यु इंग्लिश हायस्कूल येथे ह्युमन राईटस् असोशिएशन फॉर प्रोटेक्शन (सिंधुदुर्ग)आणि लायन्स आय हॉस्पिटल, नेत्रालय (कणकवली) यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराचा लाभ घेणाऱ्यांना मोतीबिंदू ऑपरेशन्स, लेन्स बसविणे आणि चष्मे अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात येतील.
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा ९४२३८०६३३६ , ९४२१२३६२९४ , ७५८८९०३३४८ अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)