ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
वडाचापाट हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा..!

वडाचापाट हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा..!

प्रकाशन: 23 Dec 2022 01:31 PM
वाचन संख्या 54

मसुरे | प्रतिनिधी :
श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल वडाचापाट प्रशालेमध्ये राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात “गणिताच्या गावाची धरली मी वाट ” या गीताने झाली. विद्यार्थ्यांनी एकूण 23 गणिती प्रतिकृती. प्रदर्शनात मांडल्या होत्या.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी आपल्या भाषणात गणिताचे जीवनातील महत्त्व विषद केले. व काही गणिती कोडी सांगितल्या.एखाद्याच्या मनातील संख्या ओळखता येते हे प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविले.

इयत्ता 8 वी,9 वी,10 वी तील विद्यार्थ्यांनी गणितीय रांगोळी काढल्या. यासाठी प्रशालेतील शिक्षिका कु. प्रतिभा केळुसकर, सौ. वेदिका दळवी व सौ प्रीती सनये यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास भंडारी एज्यु. सोसायटी (मालवण ) मुंबई चे सह खजिनदार श्री अभिमन्यू कवठणकर यांनी भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स