महापुरुषांच्या अवमान प्रकरणी नागपूर येथे महाविकास आघाडीच्या आमदारांचे तीव्र आंदोलन.
आमदार वैभव नाईक व महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी.
मुंबई | ब्यूरो न्यूज :
भाजप नेत्यांनी व राज्यपालांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते व आमदार आक्रमक झाले असून गुरुवारी त्यांनी नागपूर येथे विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन छेडले. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आंदोलनात सहभागी होत घोषणाबाजी केली.
याप्रसंगी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान करणाऱ्या सरकारचा निषेध असो, न्यायालयाचा अवमान करणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला.यावेळी शिवसेना, कॉंग्रेस, आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार आंदोलनात सहभागी झाले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)