ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे १५ सौर पथदिव्यांचे लोकार्पण..!

मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे १५ सौर पथदिव्यांचे लोकार्पण..!

प्रकाशन: 23 Dec 2022 10:15 AM
वाचन संख्या 88

मसुरे | प्रतिनिधी :
यशस्विनी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आडबंदर/ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे येथे बसविण्यात आलेल्या १५ सौर पथदिव्यांचे नुकतेच लोकार्पण समाजसेवक श्री. आनंद मालाडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आडबंदर येथे ७,आपई ३,कारीवणे ३,देऊळवाडी १,वाघोळी १ येथे नव्याने सौर पथदीप बसविण्यात आले आहेत.यावेळी माजी सरपंच सायली बागवे, माजी उपसरपंच श्री.धर्माजी आडकर, ग्राम.सदस्या सौ. रविना मालडकर, सौ.अंजली सावंत यांनी सौर पथदिवे बसवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

यावेळी पांडुरंग बापर्डेकर,तुळशीदास आडकर,अनिल देऊलकर,लीना आडकर,तुषार आडकर,संतोष बांदेकर,वैभव आडकर कल्पेश सारंग,बाळकृष्ण परब,श्रद्धा राऊत,दिगंबर बागवे,किशोरी सावंत,कविता सावंत,दुर्गा परब,संदीप आचरेकर,देविदास सावंत,एकनाथ परब,विजय पडवळ,विजय परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्व ग्रामस्थांचा वत्तीने श्री.आनंद मालाडकर यांचे सर्वांनी कौतुक करत आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स